यावल। भविष्यात जागतिक तापमानवाढीशी लढा द्यायचा असेल तर वृक्षारोपण आणि त्यांचे संगोपण करणे, हाच पर्याय आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने यात खारीचा वाटा उचलावा. वृक्षारोपणासोबतच पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन साकळी येथील शारदा विद्या मंदिराचे प्राचार्य जी.पी.बोरसे यांनी केले. स्काऊड गाइड युनीटतर्फे आयोजित वृक्षरोपण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्राचार्य बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात झाली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण जलबचतीचे महत्व पटवून दिले. पर्यवेक्षक पी. एस. जोशी, स्काऊड गाईड युनीटप्रमुख वाय. एस. सोनवणे, पी. के. बिरारी, वाय. बी. सपकाळे, आर. व्ही. महाजन, पी. एम. पाटील, वृक्षरोपण समितीप्रमुख के. के. महाजन, सदाशिव नीळे, जी. एल. चौधरी, आर.सी.जगताप आदी उपस्थित होते. शिक्षक बिरारी यांनीदेखील मार्गदर्शन केले. वृक्षारोपण का आवश्यक आहे, पटवून दिले. या वेळी शाळेच्या आवारात 10 रोपे लावण्यात आली. तत्पूर्वी, गेल्या वर्षी लावलेली 20 रोपेदेखील जगली आहेत.