तळोदा। येथील कल्याणी जगदिश परदेशी या चौथीच्या विद्यार्थींनीने आपला वाढदिवसी 9 लिंबाच्या झाडांचे रोपणकरून वेगळ्यापद्धतीने साजरा केला. एस.ए. मिशन शाळेतील 4थीची विद्याथींनी कल्याणी हिने आपल्या 9 व्या वाढदिवशी मुख्यमंत्री यांच्या पर्यावरण बचाव माहिमेचा आदर्श घेत शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.
याप्रसंगी प्रा. सुधीरकुमार माळी, रमणभाई पाटील, निखीलभाई तुरखिया उपस्थित होते. कल्याणी ही तळोदा येथील भाजपा तालुकाध्यक्ष जगदिश शंकरसिंग परदेशी यांची कनिष्ठ कन्या आहे. यावेळी मुख्याध्यापिका व्ही.डी. एलिस, किरण मगरे, हेमंत लोहार, निलकंठ सुर्यवंशी, राजेंद्र पाडवी, नेहा जोशी, भाग्यश्री जोशी, मनिषा मगरे, शमा मराठे, इमरान शेख, देवदान वळवी, निलेश गोसावी आदींनी तिचे कौतुक केले.