चोपडा। स्वा मी विवेकानंद युवा फाऊंडेशन, नेहरू युवा केंद्र जळगाव व स्वामी विवेकानंद फाऊंडेशन नेरी जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सातपुडयाच्या कुशीत आदिवासी गावात वनविभागातील चोपडा वनपरिक्षेत्रात पंधरा हेक्टर जमीनीवर वृक्ष रोपण स्वामी विवेकानंद फाऊंडेशनचे नेरी अध्यक्ष पितांबर भावसार, युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी, वनपाल एस.एस. ईवंदे, वनरक्षक एस. के.कंखरे, शितल अॅकडमी संचालक विजय पाटील, नरेंद्र सोनवणे, अवधूत फाऊंडेशनचे कैलास निकम, दिपक बनसोडे यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले
पाचोर्यात गो.से. हायस्कुलतर्फे वृक्षदिंडी
पाचोरा । पाचोरा शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से.हायस्कुल येथे आषाडी एकादशी निमित्त वृक्षदिंडी वृक्षारोपण व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृक्षारोपण प्रसंगी पीटीसी चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, शालेय समिती चेअरमन खलील देशमुख, पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड, पो.नि. धनंजय येरुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश पाटील, मुख्याध्यापक एस.डी. पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस.शिंपी, सांस्कृतिक प्रमुख प्रमिला वाघ, पर्यवेक्षक पी.पी.पाटील, ए.जे.महाजन, पी.जे.पाटील, भोला चौधरी, शांताराम चौधरी, आकाश वाघ, सह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पाच वर्षात विविध भागात केले वृक्षारोपण
1 ते 7 जुलै 2017 या कालावधीत काशीद, कांचन, चिंच, सिसु, कवठ, गुलमोहर, जांभूळ, निल, कडुलिंब, करंजी, साप्तवर्णि, वड, पिंपळ विविध जातीचे वृक्ष तसेच लोकसहभागातून पाच हजार गोळा केलेल्या विविध फळ झाडांचा व बियांचा रोपण सातपुडा पर्वत रांगेत करण्यात आले. वृक्ष जगण्याचे प्रमाणही वाढविण्याचे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र शिंपी यांनी केले. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड महत्त्वाची आहे. त्यासाठी चोपडा येथील स्वामी विवेकानंद युवा फाऊंडेशन पाच वर्षापासून तालुक्याचा विविध भागात जावून वृक्षरोपण व संवर्धन पॉपलेट जनजागृती, पथनाट्य, बी -वृक्ष लागवडी बद्दल जनहितार्थ जनजागृती उपक्रमांमध्ये अग्रेसर असते. वन विभाग व सामाजिक वनिकरणाच्या वृक्ष लागवड, पडीक जमीन विकास, जलसंवर्धन कार्यक्रमात ही सक्रीय सहभाग असतो. पर्यावरण प्रदूषणाचा मानवी जीवनावरच नव्हे, तर संपूर्ण जीवन सृष्टीवर विपरित परिणाम होत आहे.
चाळीसगाव येथे पीपल्स फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण
चाळीसगाव । नगरसेवक भाऊसाहेब पोळ, नगरसेवक भगवान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशीलनगर, धुळे रोडवरील मजिद येथे पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी 5 जुलै 2017 रोजी फाऊंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ व पंचशिल नगर येथील महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आशाताई खेडकर, छायाताई शिंदे, मायाताई पोळ, माधवीताई पोळ, आरतीताई बोराडे, प्रमिलाताई निकम, डॉ. तुषार राठोड, संदीप सरोदे, रोहित शिंदे, विकास पोळ, अरविंद खेडकर, अजिंक्य त्रिभवन, वीरेंद्र राजपुत, जैनुदिन शेख यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अनिकेत पोळ, प्रणाल पवार, पंकज कदम, शुभम सोनावणे, शुभम महाजन, अभिषेक महाजन, पवन महाजन, ललित महाजन, यशोदिप रणधीर, साहिल शेख, ऋषिकेश सूर्यवंशी, ऋषिकेश देशमुख, मयुर सानप, हर्षल जोशी, संदेश पोळ, राहुल सांगिले, बाला पवार, चेतन वाघ, राकेश त्रिभुवन आदी उपस्थित होते.
मान्यवरांचे उपस्थितांना मार्गदर्शन
मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जलप्रदूषण रोखण्यासाठी नदया स्वच्छ करणे गरजेचे आहे. पितांबर भावसार नेरी जामनेर यांनीही मार्गदर्शन केले. या वृक्षरोपण सप्ताहास जळगाव येथील नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम, व्यवस्थापक सुनिल पंजे व यावल वनविभागाचे उपवनरक्षक संजयकुमार दहिवले यांचे मोलाचे मार्गदर्शन सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल जैन, मधुकर पाटील, सारंग वडे, रविंद्र निकम यांनी परिश्रम घेतले.