धुळे । जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण दिनानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संस्थांतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांसह नागरिकांनी वृक्षरोपण करत या मोहीमेत सहभाग नोंदविला. शिरपूर येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालय , सौ सावित्रीताई रंधे कन्या विद्यालय व खान्देश पर्यावरण सरक्षण मंडळ यांच्या संयुक्त विदयमाने वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीचे पुजन वनपाल भूषण पाटील यांनी केलेे. वृक्षदिंडीचे उद्घाटन म.ज्यो.फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी.आढावे व कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका मंगला पावरा यांच्या हस्ते झाले.
या वृक्षदिंडीत एकूण 500 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेऊन झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश व घोषणा या वृक्षदिंडीद्वारे दिला. या वृक्षदिंडी मध्ये विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका श्रीमती.एस. एस.जोशी,पर्यवेक्षक पी.टी.पाटील,पी.ए.पावरा, आर. सी.पाटील,हरित सेनेचे एम.के.वाणी,व्हि.एम.काळे खान्देश पर्यावरण संरक्षण मडळाचे संस्थापक अध्यक्ष हेमंत शेटे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिंडी आयोजना नंतर विद्यालयात वृक्षरोपण करण्यात आले.
अर्थे आश्रमशाळेत वृक्षदिंडी
वाडी । तालुक्यातील अर्थे खु. येथील शासकीय आश्रम शाळेत 1 जुलै रोजी वृक्ष दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम.पी.जाधव यांनी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन व संगोपन आणि वृक्षांचा मानव जीवनाशी असलेला संबध या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी एस.एस.खराटे अधिक्षक,पी.एल.सुर्यवंशी,डी.आर पाटील, सौ.सी.डी.पाटील,सौ.जे.पी देवरे,एस जे.सोनवणे,एन.पी गवळे,वाय एस पावरा, जे.एच.निकुंभे,एस.डी.पावरा अधिक्षीका, बोरसे,महाले,फुलपगारे आदि शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभाग घेतला होता.
होळनाथे खंडेलवाल विद्यालयात वृक्षरोपण
होळनाथे । येथील आर. आर. खंडेलवाल विद्यालयात वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या आवारात विविध जातीचे वृक्ष लावण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक एन. जी. पिंगळे, उपसरपंच वासुदेव राजुपत, अंजदे बु चे ग्रा. पं. सदस्य सचिन राजपुत, जोगेश्वरी संस्था व राजमुद्रा प्रतिष्ठानचे योगेश पाटील, डॉ. राहुल पाटील, नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक भटेसिंग राजपुत आदी उपस्थित होते.
काकणी विद्यालयात विविध वृक्षांची लगावड
साक्री । तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात 50 हून अधिक विविध जातीच्या वृक्षांची रोपे लावण्यात आली. तर विद्यार्थ्यांना शाळेतर्फे मोफत रोपे देण्यात आली. तर या रोपांना संरक्षण म्हणून देशबंधू गुप्ता फाऊंडशेनतर्फे टी गार्ड लावण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस. एन. हयाळीज, एन. डी. शिंदे, व्ही. वाय. कुवर, भटू वाणी, एस. बी. मराठे, जी. एम. मारनार, पी. डी. शेवाळे, के. व्ही. देवरे, बी. आर. सोनवणे, एम. एम. देवरे, प्रा. एच. व्ही पाटील, प्रा. एस. बी. भामरे आदी उपस्थित होते.
बेटावद ग्रामपंचायततर्फे वृक्षरोपण
बेटावद ता. शिंदखेडा । येथील ग्राम पंचायततर्फे गावतील विविध ठिकाणी वृक्ष रोपण करण्यात आले. सरपंच अरूण देशमुख, उप सरपंच रहिम खाटीक, ग्रा. पं. सदस्य प्रा. बी. एम. पाटील, रमेश भिल, ग्रामसेवक आनंदा पाटील आदींच्या हस्ते मदिना उर्फे जामा मशिदित वृक्ष रोपण करण्यात आले. याप्रसंगी मुस्लीम पंच मुश्ताक पठाण, दगा शे. रशीद, रहिम पठाण, आसीफ कुरेशी व मुजाहीर मन्यार, मोहसीन शेख, दिपक चौधरी आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळा नं. 1, 2 व वार गाव जि. प. शाळेतही वृक्षरोपणक करण्यात आले. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतीचे सागर बुवा, ईश्वर माळी, मुरलीधर माळी, सुरेश महाजन आदींनी कामकाज पाहिले.