वृक्षारोपण हे गरजेचे परंतू ते जगवणे काळाची गरज

0

धरणगाव। पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वृक्षांची लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्राचार्य डॉ. बिराजदार यांचे प्रतिपादन यांनी केले. ते येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमास प्राचार्य डॉ. टी.एम.बिराजदार, संचालक अजय पगारीया, उपप्राचार्य प्रा.एच.एम.महेतर, पर्यवेक्षक प्रा.आर.आर.पाटील, कला विभाग प्रमुख प्रा.बी.एल.खोंडे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.एम.एस.कांडेलकर यांच्या उपस्थितीत झाला.

वृक्षसंवर्धनासाठी यांनी घेतला सहभाग
यावेळी महाविद्यालयीन पर्यावरण विभाग समिती प्रा.बी.एल.खोंडे, प्रा.ए.आर.पाटील, प्रा.आर.आर.पाटील, प्रा.डी.डी.पाटील यांनी मागील वर्षी 50 कडूलिंबाचे वृक्षांच्या संवर्धनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून वृक्ष जगविले आहे. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाच्या या वर्षाच्या योजनेखाली जवळपास 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले असून या वृक्षांच्या संवर्धनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सौ.एन.एम.पवार यांनी केले तर आभार प्रा. विश्‍वजीत बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.एस.आर.अत्तरदे, प्रा.व्ही.आर.पाटील, प्रा.आर.ए.पाटील, प्रा.सौ.आर.बी.बिरारी, प्रा.एन.डी.सोनवणे, प्रा. कविता चौधरी, प्रा.जे.एम.तायडे, प्रा.उमेश पाटील, प्रा.एस.आर.पाटील, प्रा.पी.सी.साळवे यांनी सहकार्य केले.