वृक्ष प्राधिकरण समितीवर 7 सदस्यांची निवड

0

पुणे । महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांची निवड गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. नगरसेविका फरजाना अय्युब शेख यांचा जातीचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीने अपात्र ठरवल्याने त्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाही. मुंबई हायकोर्टाने त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर गुरुवारी ही निवड प्रक्रिया पार पडली. समितीवर सध्या 7 नगरसेवक सदस्य आहेत. यामध्ये धनंजय जाधव, अरविंद गोरे, सचिन पवार, संदीप काळे, शिल्पा भोसले, मनोज पाचपुते आणि डी एस पोळेकर यांचा समावेश आहे.