वृक्ष लागवडीच्या कार्यशाळेचे आयोजन

0

शहादा । दुधखेडा ता. शहादा येथे वनविभाग,कृषी विभाग आणि महसुल विभागाच्या संयुक्त विद्यमाने 4 कोटी वृक्ष लागवडीच्या संदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, आ. उदयसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आणि प्रत्येक विभागाची तयारी याविषयक आढावा आमदार उदेसिंग पाडवी यांनी घेतला. वनविभागाची नर्सरीची पहाणी करून आ.पाडवी यांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी आमदार पाडवी यांच्या सोबत प्रांत अधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार मनोज खैरनार, सहाय्यक उपवनसंक्षक पी.पी.सुर्यवंशी, उपविभागीय कृषी अधिकारी मोहन रामोळे, गटविकास अधिकारी श्रीराम कांगणे, वनक्षेत्रपाल एस. टी. पवार, वनक्षेत्रपाल एम.एस.फुलपगार, एम.पटेल, भाजपा चे तालुका अध्यक्ष डॉ. किशोर पाटील, दिनेश खंडेलवाल,शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे, मनोज चौधरी,धनराज ईशी, बाळा वळवी, राष्ट्रवादीचे अनिल भामरे, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.