वृक्ष लागवड जनजागृतीपर पथनाट्ये

0

जळगाव । महाराष्ट्र शसनाच्या सामाजिक वणीकर विभाकडून संपूर्ण जिल्हात 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. तुळजाई बहुउद्देशिय संस्थेतर्फे 18 ते 30 या कालावधीत वृक्ष लागवड जनजागृतीपर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. यासाठी वन विभाग, सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्य लाभले. पाचोर्‍या 30, भडगाव 30, एरंडोल 30, धरणगाव 30 असे एकुण 120 पथनाट्य चार तालुक्यात सादर करण्यात आली. वृक्ष लागवड जनजागृतीपर पथनाट्य मोहीमला ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्तम प्रतिसात दिला.

बसस्टँड, ग्रामपंचायत, बाजार, शाळा, महाविद्यलाय, गावचावडी यासह चौका-चौकात पथनाट्याचे सादरीकरणे करण्यात आले. कलाकार चंद्रकांत इंगळे, विनोद पाटील, विकास वाघ, विशाल पाटील, शैलेश दुबे, अभिजित पाटील या सर्वानी 4 कोटी वृक्ष लागवड जनजागृतीपर पथनाट्य सादर केली. गावनिहाय नियोजन आर.एफ.ओ नेमाडे, भोई व वनरक्षक सामाजिक वनविभागाचे अधिकारी यांनी बघितले आहे. तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी, महेंद्र उडमले, शिरीष तायडे, पितांबर भावसार, सागर पाटील हे नियोजनासाठी परिश्रम घेतले आहे.