भुसावळ । राज्यात 2017 ते 2019 या कालावधीत 50 कोटी वृक्ष लागवड मोहिम तीन टप्प्यात राबविण्यात येणार असून यावर्षी चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट आहे. वृक्ष लागवड मोहिमेसाठी शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. पहिल्या टप्प्यात येत्या 1 ते 7 जुलै कालावधीत तालुक्यातील 202 शाळा प्रत्येकी 4 असे एवूैण 808 झाडे लावणार असल्याची माहिती नुतन गटशिक्षणाधिकारी सुमित्र अहिरे यांनी दिली. गटसाधन केंद्रात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मोहिमेसाठी मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रशिक्षण
शालेय पोषण आहार अधिक्षक सुमित्र अहिरे यांनी नुकताच गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार घेतला. यावेळी शिक्षकांनी अहिरे यांचा सत्कार केला. वृक्ष लागवड मोहिमेसाठी सर्व मुख्याध्यापक व तंत्रस्नेही शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आहे. सर्व शाळांनी बीईओ लॉगइन आयडीवर सदस्य नोंदणी करणे आवश्यक आहे. सदस्य नोंदणी झाल्यानंतर शालेय परिसरात खोदलेल्या खड्ड्यांची संख्या नमूद करुन फोटो अपलोड करावे. यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घ्यावी. 25 जुन पर्यंत ही सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. 1 जुलै रोजी रोपांची लागवड करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. पर्यावरण व नैसर्गिक संसाधनाचे रक्षण करणे हे आपले मुलभूत कर्तव्य आहे. सर्वांनी मिळून वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, संजय भटकर, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष एस.पी. भिरुड, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. धनगर, तळवेल येथील पंडित नेहरु विद्यालयाचे पर्यवेक्षक एस.एस. अहिरे, दिपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एस.जंगले, गाडेबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण धनपाल, प्रतिभा पाटील शाळेचे देव सरकटे, इंदिरा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक जी. आर. चौधरी, मुख्याध्यापक जे. पी. सपकाळे आदी उपस्थित होते.