वृक्ष लागवड वनविभागाचा नव्हे; हा आपला कार्यक्रम

0

नवापूर । तालुक्यातील शेवटचे टोक असलेले कारेघाट येथे अंतर्गत 1000 वृक्षरोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प.स सभापती सविता गावीत,जि.प सदस्या संगीता गावीत,उपसभापती दिलीप गावीत ,सरपंच फत्तुबाई गावीत,उपसरपंच दिलीप गावीत,तहसीलदार प्रमोद वसावे,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे,तालुका कृषी अधिकारी वसंत चौधरी व शिरीष कोकणी, समता दूत सारिखा दहीवेलकर, समता दूत मीनाक्षी दांडवेकर,आदी उपस्थित होते.

झाडे जगविण्याची जबाबदारी घ्या आपण हे झाडे जगविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे असे माणिकराव गावीत म्हणाले. यानंतर त्यांनी त्या वेळचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी आदीवासी खासदार यांना वनविभागात वृक्ष संवर्धनसाठी देशभर वन पाहणीसाठी पाठविले होते त्यावेळी मी वृक्ष पाहणीसाठी खूप राज्यात फिरलो होतो असे सांगितले. आणि महूचे झाड 1 औषधी झाड आहे ते मोठ्या प्रमाणात लागवड करावे असे माणिकराव गावीत म्हणाले.यानंतर सभापती सविता गावीत व उपसभापती दिलीप गावीत यांनी वृक्ष संवर्धनासाठी ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा व झाडे जगवावे असे आवाहन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक परमेश्वर गंडे,पेसा समन्वयक विजय ठानकर,वनपाल ए.एन.जाधव,वनपाल कृष्णा वळवी,वनपाल एस. एल.कासार,वनरक्षक चित्ते आदींनी परिश्रम घेतले.

कर्मचार्‍यांनी केले नियोजन
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत म्हणाले कि, वृक्ष लागवड हा कार्यक्रम हा वनविभाग,अधिकारी यांचा नसून तो आपला आहे.अधिकारी, कर्मचारी यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम नियोजन केले पण काही दिवसात अधिकारी कर्मचारी बदली होऊन जातील पण आपल्याला कायम येथे राहायचे आहे. म्हणून हा कार्यक्रम आपला आहे. गावातील महिला बचत गटाने श्रमदान करून 1000 वृक्ष लागवड केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक चेतन चव्हाण यांनी केले तर आभार वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांनी केले .