वृक्ष लागवड ही सामाजिक जबाबदारी

0

चाकण : वृक्ष लागवड व संवर्धन ही समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि समूहांसाठी सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी शासन-प्रशासनाबरोबरच लोकसहभागसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन खेडचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे यांनी केले. चाकण (ता. खेड) येथील विद्याधाम कॉलनी परिसरात राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी गाढे बोलत होते.

उपयुक्त झाडे लावली
राज्य शासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत चाकणला ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. येथील विद्याधाम कॉलनी परिसरात प्रांताधिकारी सुनील गाढे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निंब, वड, पिंपळ, सायर, बाभूळ, साग, कांचन, निलगिरी, आदी विविध प्रकारची उपयुक्त झाडे लावण्यात आली. यापुढेही ही मोहीम सुरूच राहणार असून, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकरराव कड, पांडुरंग शिरसाठ, मधुकर संधान, रामचंद्र आवटे, धर्मानंद कालेकर, नीलेश कड-पाटील, किरण कौटकर, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब चौधरी, डी. डी. गोरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.