चोपडा। धरती मातेचे आपल्यावर अनेक ऋण आहेत. ते ऋण फेडण्यासाठी माणसाने नेहमी तत्पर असले पाहिजे. वृक्ष लावल्याने हे पुण्य कर्म करता येते. कारण वृक्ष लावणे म्हणजे धरतीला कन्यादान करणे होय, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी केले. चोपडा येथील भगिनी मंडळ संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहा वनसंरक्षक व्ही.एच.पवार, चोपडा वनक्षेत्रपाल पी.बी.पाटील, संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी, सहसचिव अश्विनी गुजराथी, प्रभाबेन गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. ईश्वर सौंदाणकर, राजेंद्र महाजन, मुख्याध्यापक सुनील चौधरी, डॉ.संजय चौधरी, अरुण संदानशिव, वनरक्षक बी.एन. पाटील, डी.आर. धांडे, सीमा भालेराव, राजू भाटीया, अ.भा. महिला परिषदेच्या संध्या शाह हे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलतांना प्रा. गुजराथी म्हणाले, आकाशातून बघितल्यास घरांपेक्षा झाडे जास्त दिसली पाहिजे. यासाठी दरवर्षी माणशी किमान एक झाड लावून त्याचे उत्तम संगोपन केले पाहिजे.
चोपडा सूतगिरणीत वृक्षारोपणास प्रतिसाद
चोपडा । येथील चोपडा शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या धरणगाव रस्त्यावरील कार्यस्थळावर शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमास प्रतिसाद देत तहसीलदार दिपक गिरासे, चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. तहसीलदार गिरासे यांचे चेअरमन पाटील यांनी यथोचित स्वागत केले. यावेळी चेअरमन माजी आमदार कैलास पाटील यांनी सूतगिरणीच्या कार्यस्थळ परिसरातील जमिनीवर वड, पिंपळ, या कल्पवृक्षांसह आंबा, चिंच, कवीट, निंब, आवळा या सारखे सुमारे तीनशे ते चारशे वृक्ष टप्प्या टप्प्याने लावणार असल्याचे सांगितले. सूतगिरणीचे कार्यस्थळ काही वर्षांपूर्वी बाभूळवाडी म्हणून हिणवले जायचे पण आता सूतगिरणी प्रत्यक्ष सुरु झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार करुन सजविण्याचा आपला मानस आहे. वृक्ष लागवड करतांना सुतगिरणीला भविष्यात उत्पन्न मिळावे असा दृष्टीकोन वापरला जाणार असून काही वर्षात हा परिसर झाडांनी वेढलेला असेल असे प्रतिपादन माजी आमदार पाटील यांनी केले. यावेळी सूतगिरणी परिसरात संचालक अशोक पाटील, प्रकाश रजाळे, तुकाराम पाटील, शशीकांत पाटील, रंजना नेवे, जागृती बोरसे, राजेंद्र पाटील, रामदास चौधरी, माधवराव पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक मांतेश महाजन, अधिकारी विजय पाटील, सुनिल पाटील, बांधकाम सुपरवायझर परेश गुजराथी, बगीचा विकासक मराठे यांच्यासह सूतगिरणीचे कर्मचारी हजर होते.
जवखेडे येथे वृक्षारोपण समारोप
अमळनेर । तालुक्यातील जिल्हा परीषद प्राथ शाळा जवखेडे येथे वृक्षारोपण समारोप कार्यक्रमासाठी शाळेत वृक्षारोपण करतांना तसेच शाळेच्या बोरवेलसाठी शिक्षकांनी स्वखर्चातून शाळेतील बोरवेलसाठी विद्यूत पंप आणून दिला. त्यामुळे सर्व शिक्षकांचा सत्कार करून विद्युतपंपाचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ, पंचायत समिती सभापती वजाताई भिल, तहसिलदार प्रदिप पाटील, जि.प. सदस्य संदिप पाटील, पं.स. सदस्य भिकेश पाटील, युनियन बँकेचे मॅनेजर मयुर पाटील, सरपंच शामकांत पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा निशाताई पाटील, सरपंच लटकन पाटील, डी.जी.पाटील, शिक्षक रघुनाथ पाटील, पोलिस पाटील उल्हास लांडगे, मुख्याध्यापक छगन पाटील तसेच गावातील जेष्ठ नागरिक ग्रामस्थ परिसरातील नागरिक ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पाकिजा पिजारी यांनी केले.
एका तासात 200 झाडे लावली
महाराष्ट्र शासनाच्या ’चार कोटी वृक्ष’ लागवडीच्या या उपक्रमात उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात एका तासात विविध 200 झाडे लावत त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली आहे. ’ग्रीन कॉलेज कॅम्पस’ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. सहा वनसंरक्षक व्ही.एच. पवार यांनी यावेळी बोलतांना सांगितले की, 1 ते 7 जुलै या सप्ताहात शासनाचे 4 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट एक दिवस आधीच पूर्ण झाले असून सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात आणखी 1 कोटी वृक्षांची लागवड होईल. आपल्या वनविभागातही उद्दीष्टापेक्षा जास्त लागवड या कालावधीत झाली आहे, असे सांगत विविध विभाग व संस्थांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.ईश्वर सौंदाणकर यांनी केले. वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा.मोहिनी उपासनी, प्रा.आशिष गुजराथी यांच्यासह प्रा.शैलेष पाटील, प्रा.नारसिंग वळवी व शिक्षक-शिक्षकेतर वृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
संस्थेने अभिनव उपक्रम राबविण्याचे आवाहन: संस्थेच्या समाजकार्य महाविद्यालय, प्रेरणा मतिमंद विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात विविध प्रकारच्या 27 झाडांची एका ठिकाणी लागवड व संगोपन करुन 27 झांडांचे नक्षत्र तयार करुन संस्थेने अभिनव उपक्रम राबवावा. त्यासाठी वनविभागाने सहकार्य करावे. ’ग्रीन कॉलेज कॅम्पस’ करुन आदर्श निर्माण करावा, असेही त्यांनी याप्रसंगी सुचविले.
महावितरण कार्यालयात वृक्षारोपण
पाचोरा । महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात वृक्षारोपण करतांना कार्यकारी अभियंता प्रविण मोरे सोबत फुलपगारे अन्य महावितरणचे कर्मचारी.
ब्राम्हणशेवगे येथे ग्रामपंचायत व हरित सेनेतर्फे वृक्षारोपण
चाळीसगाव । वृक्ष लागवड सप्ताह निमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. पहिल्या दिवशी गावातुन वृक्ष दिंडी काढण्यात येऊन जनजाग्रुती करण्यात आली.तसेच या सप्ताहानिमीत्त डेरेदार झाडांच्या बिया जमा करणे, शेतकरी बांधवाना त्याचे वाटप करणे तसेच रोपे मागणी करणार्या ग्रामस्थांना मोफत रोपे वाटप करणे या उपक्रमांचा समावेश होता.या उपक्रमात सरपंच आशा माळी,उपसरपंच सोनाली पाटील, सोमनाथ माळी, ग्रा.पं.सदस्य शांताराम नेरकर, रत्नाकर पाटील, मा.सरपंच दत्तात्रय पवार आदि सहभागी झाले होते.
भडगावात रोपांचे वाटप
भडगाव । येथील पेपर एजंट प्रशांत खांडेकर यांनी वृक्षारोपण सप्ताहाचे औचित्य साधुन भडगाव येथील शाळांना रोपे भेट दिली. लाडकुबाई शाळा, आदर्श कन्या शाळा, सुमनताई पाटील शाळा, बालविकास व पुनम पवार या शाळांना प्रत्येकी तीन रोपे वाटप करण्यात आली. लाडकुबाई शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा मॅडम, सुमनताई पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाटील, आदर्श कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ, बालविकास शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना खांडेकर व पुनम पवार शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती देसले या सर्वांनी प्रशांत खांडेकर यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांनी त्यांचे आभार मानले. भडगाव बसस्थानकात येथील माऊली फाउंडेशन व बसस्थानक परीसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अगार प्रमुख सी.बी.पाटील, वाहतूक नियंत्रक किरण काकडे, स्थानक प्रमुख एम.एफ. सय्यद, दादा भोई, प्रवीण पाटील, पवन पाटील, अनिल पाटील, माऊली फाउंडेशन पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अगार प्रमुख सी.बी.पाटील व वाहतूक नियंत्रक किरण काकडे यांनी वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. प्रवाशांसाठी परिसर सुशोभीकरण करण्यावर भर असल्याने आगामी काळातही अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. भडगाव तालुक्यातील पळासखेडे माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपणाचा वि कार्यक्रम घेण्यात आला .विद्यालयाच्या आवारात विविध रोपांची लागवड केली गेली. झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्यात आला. वृक्ष लागवड, संवर्धन, निसर्गाचा समतोल, पाणीटंचाई, वृक्षतोड या विषयी विद्यार्थीना माहिती देण्यात येऊन ’वृक्षांचे महत्व, त्यासाठी करावयाची जनजागृती’ या विषयी प्रबोधन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक अभिजीत शिसोदे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.