दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन
पहूरला पत्रकार दिनी निबंध स्पधेचे बक्षीस वितरण
पहूर – आजच्या सामाजिक प्रसार माध्यमांच्या काळातही वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम टिकून आहे. संवादाची विविध माध्यमे उपलब्ध असूनही सोशल सोशल मिडीयाच्या गैरवापरामुळे कुटूंबातील सुसंवाद हरवला आहे.हा सुसंवाद घडविण्यासाठी वृत्तपत्रांचे वाचन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. राहूल रनाळकर यांनी केले. पहुर पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनी आयोजित निबंध लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पहूर पेठ गृप ग्रामपंचायत सभागृहात पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला. प्रारंभी सरस्वती विद्यामंदिरच्या विद्यार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. रनाळकर म्हणाले की, जनतेच्या न्यायासाठी पत्रकारांनी जनतेचे वकील व्हावे, वृत्तपत्रांमध्ये नेतृत्त्व निर्माण करण्याचे सामर्थ्य असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्घाटन दिव्य मराठीचे ( जळगांव )युनिट हेड संजीव पाटील यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून दिव्य मराठी ( औरंगाबाद ) सुभाष बोंद्रे यांची उपस्थिती होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी केले. यावेळी निबंध स्पर्धा घेण्यात आली यात ’अ’ गटातून प्रथम ज्ञानेश्वर द्राक्षे, द्वितीय वैष्णवी चौधरी, तृतीय सोनल पांडूरंग पाटील तर उत्तेजनार्थ रूपाली पाटील आणि ’ब’ गटातून प्रथम प्रेरणा चौधरी, द्वितीय किरण पाटील, तृतीय नवल कोंडे तर उत्तेजनार्थ जुबेर तडवी हे निबंध स्पर्धेत विजयी विद्यार्थी असून त्यांना बक्षिसे देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी माजी जि.प.राजधर पांढरे, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, माजी कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी मुख्याध्यापक एस.एस. गावंडे, हेमंत जोशी, सरपंच पती रामेश्वर पाटील, अरविंद देशमुख, आर.बी.पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कृउबा सभापती संजय देशमुख पं.स.सदस्या पूजा भडांगे, सरपंच निता पाटील, सरपंच ज्योती घोंगडे, तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण गोरे, दौलत घोलप, पंडित सोनार, समाधान पाटील, एम.के.पांढरे, रविंद्र पांढरे, डॉ. विजय लेले, उपसरपंच रविंद्र मोरे, योगेश भडांगे, मुख्याध्यापक पी.टी. पाटील, सुधाकर घोंगडे, भिका पाटील, हरिभाऊ राऊत आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध संस्थांनी पत्रकार बांधवांचा सत्कार केला. यशस्वीतेसाठी पत्रकार संघटनेचे उपाध्यक्ष रविंद्र घोलप, रविंद्र लाठे, किरण जोशी, डॉ.संभाजी क्षीरसागर आदींनी सहकार्य केले. सुत्रसंचालन सचिव शंकर भामेरे यांनी केले. गणेश पांढरे यांनी आभार मानले.