पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभागाकडून दिवाळीनिमित्त केले आयोजन
चिंचवड : पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाच्या चिंचवड विभागाकडून दिवाळीनिमित्त संघातील सदस्यांसाठी कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सर्व वृत्तपत्र विक्रेते व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. मोहननगर येथील महादेव मंदिर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला नगरसेवक नारायण बहिरवाडे, राजू गुणवंत, सदाशिव जंगम, वीरभद्र वाणी, भालचंद्र देशपांडे, विभागप्रमुख राजकुमार ढमाले, महावीर भराटे, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, कामगार नेते इरफान सय्यद, अरूण निवंगुणे, प्रवीण जाधव, नितीन पारेख, अतुल पारगे, सुहास जाधव, अभय नरवडे, परशुराम सईद आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत मयुरी काकडे, साई नामदे, संस्कृती सस्ते, अदिती नामदे, अपूर्वा नामदे, विलास जंगम, कुणाल भराटे, अभिमान विटकर, महती कासट, वैष्णवी सुरवसे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 10 वी व 12 वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सिध्देश जंगम, रूचिता बेंडखळे, विद्या चौधरी, प्रथमेश नामदे या विद्यार्थ्यांना 5000 रूपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
विविध कला-गुण प्रदर्शन
महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते इरफान सय्यद यांनी रूचिता रमेश बेंडखळे हिला शैक्षणिक खर्चासाठी 10,000 रूपयांचा धनादेश दिला. क्रीडाक्षेत्रात विशेष प्राविण्य मिळाल्याबद्दल मृण्मयी शिंदकर सायली गोरे, ईशा रोहोकले, गार्गी काकडे, ज्योती गुंड या खेळाडूंना गौरविण्यात आले. तसेच वृत्तपत्र विक्रेते मनोज काकडे व रघुराज येरंडे यांना गड-किल्ल्यांसंदर्भात विशेष कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आले. याप्रसंगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, कामगार नेते इरफान सय्यद, अरूण निवंगुणे, प्रवीण जाधव, नितीन पारेख, अतुल पारगे, सुहास जाधव, अभय नरवडे, परशुराम सईद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. विक्रेत्यांच्या मुलांनी यामध्ये सहभाग घेऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. रोजच सकाळी उठून पळणार्या विक्रेत्यांना या मेळाव्यामुळे आनंदाचे काही क्षण निवांतपणे अनुभवता आले.
विक्रेत्यांनी केले आयोजन
या कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल कातळे, पत्रकार विनोद पवार, गणेश यादव, प्रकाश यादव, राहुल कोल्हटकर, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष दत्ता पिसे, उपाध्यक्ष अनंता भिकुले, प्रवीण माने, सुर्यकांत भोईर, देविदास शेळके, कृष्णाकांत कांबळी व विविध विभागातून आलेले वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते. तसेच वितरण प्रतिनिधी विजय जाधव, सुनिल महापुरे, मराठे, संतोष जराड, किशोर अमराळे, मंगेश शिंदे, निलेश बरबटे, दिनेश देवकाते, संदीप बदाले, अभिजीत कुर्हाडे हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल नामदे, सुर्यकांत शिंदकर, सुनिल सुरवसे, नितीन ठाकुर, बाळू गोरे, सुभाष डफळ, विठ्ठल सस्ते, गणेश जाधव व विभागातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल दळवी यांनी केले तर आभार विनय शेट्टी यांनी मानले.