वृद्धाला मारहाण करत लुटले

0

रहाटणी : दुचाकीवरून जाणार्‍या वृद्धाला अज्ञात तिघांनी धक्का देऊन पाडले. त्यानंतर मारहाण करत वृद्धाकडील 69 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना साई चौक रहाटणी येथे शुक्रवारी (दि. 2) पहाटे चारच्या सुमारास घडली. चंद्रकांत देवराम कांबळे (वय 63, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई चौक रहाटणी येथून कांबळे त्यांच्या स्कुटरवरून जात होते. जगताप डेअरी चौकाजवळ पाण्याच्या वॉलजवळ ते आले असता भरधाव वेगात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांनी धक्का दिला आणि खाली पाडले. यामध्ये कांबळे यांना दुखापत झाली. त्यानंतर तिघांनी कांबळे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्याकडील सोन्याची साखळी, अंगठी, दोन मोबाईल फोन आणि 20 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 69 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस बी पाटील तपास करीत आहेत.