वृद्धेच्या खून प्रकरणी आरोपीला 19 पर्यंत पोलिस कोठडी

0

फिरायला जाण्यावरून खटका उडाल्याने केला खून ; पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी

भुसावळ- शहरातील अकबर टॉकीज परीसरातील 60 वर्षीय बेपत्ता सरला अशोक भांडारकर (60, रा.अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) यांचा मृतदेह झेडटीआयआय भागातील रेल्वे गेटनजीक रविवारी आढळला होता. शवविच्छेदन अहवालानंतर या वृद्धेचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर व या वृद्धेचे संशयीत आरोपी अजीज खाटीक (42, अकबर टॉकीज परीसर, भुसावळ) याच्याशी अनैतिक संबंध असल्याची बाबही उघड झाली होती शिवाय आरोपी गावातून गायब झाल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. आरोपी वृद्धव्ेच्या खुनानंतर भुसावळातील आरोपी मध्यप्रदेशातील सतना येथे सासूकडे आश्रयाला असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या होता. आरोपीला घेवून पथक मंगळवारी रात्री उशिरा शहरात दाखल झाल्यानंतर बुधवारी त्यास न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
फिरायला जाण्यावरून खटके उडाल्याने केला खून
समजलेल्या माहितीनुसार, 60 वर्षीय वृद्धेसोबत आरोपी झेडटीआरआय भागातील निर्जनस्थळी नेहमीच जात होता मात्र काही दिवसांपूर्वी उभयंतांमध्ये या बाबीवरून खटके उडाले व खुनाच्या दिवशीही याच कारणावरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. आरोपीने वृद्धेला संतापाच्या भरात फेकून दिले व शेजारीच पडलेल्या दगडाने वृद्धा गतप्राण होईस्तोवर तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचे समजते. या घटनेनंतर आरोपी पोलिस अटक करतील या भीतीने मध्यप्रदेशातील सतना येथे पसार झाला मात्र पोलिसांनी त्याच्या अखेर मुसक्या आवळल्या. बुधवारी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी आरोपीला घटनास्थळी नेले व तेथे त्याने नेमकी कशा पद्धत्तीने घटना घडली? याची माहिती दिली.