वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करुन चोरी

0

जामनेर । तालूक्यातील बेटावद येथील शेतात वस्तीवर राहणार्‍या वृद्ध दापंत्यावर 2 मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर चार चोरांनी जिवघेणा हल्ला करीत जबरी चोरी केली. या घटनेत वयस्क वृध्दाच्या डोक्यावर चोरट्यांनी धारदार शस्राने वार केल्याने डोक्याला 28 टाके टाकले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेटावद खुर्द येथील किसन रामकृष्ण डोंगरे (78) व त्यांच्या पत्नी दगडाबाई किसन डोंगरे (75) हे गावा शेजारील आपल्याच शेतात बनविलेल्या खोलीत राहतात.काल दि.2 च्या रात्री आपले जेवण वैगेरे आटपून खोलीत झोपले असता मध्यरात्री नंतर चार चोरांनि बळजबरी घरात प्रवेश करून त्यांना पैशांची मागणी केली.

डोक्यावर धारदार हत्याराने वार; 1 लाखाचा ऐवज लंपास
डोंगरे यांनी विरोध केल्यामुळे चोरांनी त्या दोघांना काठ्यांनी मारहाण करीत किसन डोंगरे यांच्या डोक्यावर विळ्यासारख्या धारदार शस्राने वार केले. यात ते जखमी झाले त्यानंतर चोरट्यांनी घरातील रोख रक्कम 2 हजार रुपये, चांदीच्या पाटल्या, मंगळसुत्र, चांदीचे जोडवे, सोन्याची अंगठी असा 1 लाखाचा ऐवज चोरट्यांनी लुबाडून पोबारा केला. यात किसन डोंगरे यांच्या डोक्याला 28 टाके पडले. आज सकाळी हा प्रकार उघडकिस आला. ोंगरे दापंत्याला लागलीच जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. घटनेची माहीती मिळताच पोलीस निरीक्षक नजीर शेख, पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील, कालीचरण बिर्‍हाडे, राजेंद्र कांडेकर, योगेश सुतार, हरीश पोळ यानी धाव घेतली. तसेच जळगाव येथूनही श्‍वान पथक व ठसे तंज्ञाना बोलाविण्यात आले. जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेतील जखमी दाम्पंत्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.