पिंपरी : आपण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यास आपली मुले देखील आपल्याला वृद्धाश्रमात ठेवतील. कारण आपलेच अनुकरण आपली मुले करतील. वाढत्या लोकसंख्येमुळे समस्या वाढत आहे. समाज बांधवांनी एकत्र आल्यास समाजातील समस्या कमी होतील. समाज प्रवाहात वावरत असतो. आजकालची मुले आपल्या आई-वडीलांचा सांभाळत करत नसल्याने समाजात वृद्धाश्रमाची संख्या वाढली आहे. ही शोकांतिका असल्याची खंत खासदार श्रीरंग बारणे यांनी रावेत येथे व्यक्त केली. अहिर सुवर्णकार समाज पिंपरी-चिंचवड आयोजित केलेल्या समाज मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी सराफ व्यावसायिक विलास भांबुर्डेकर, शिवसेनेच्या चिंचवड विधानसभेचे संघटक संतोष सौंदणकर, अहिर सुवर्णकार समाज पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुनील निकुंभ, मेळावा प्रमुख गणेश सोनार, तुळसीदास वडनेरे, जन्मबंधचे अध्यक्ष प्रभाकर मोरे आदी उपस्थित होते.
मेळाव्यास उत्तम प्रतिसाद
विलास भांबुर्डेकर म्हणाले की, माणूस हा कळपात राहणारा प्राणी आहे. मानवानेच जाती निर्माण केल्या आहेत. सोनार समाजात असलेल्या 18 पोटजातींच्या नागरीकांनी एकत्र आले पाहिजे. वधू-वर मेळावा सर्व शाखीय समाज बांधवांसाठी विनामूल्य आयोजित करून 530 मुला-मुलींनी सहभाग घेतला. 1500 ते 1800 पालकांनी उपस्थिती नोंदविली, असे समाज अध्यक्ष सुनील निकुंभ यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी दुसाने व पूजा सोनार यांनी केले तर आभार दीपक सोनार यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळावा उपाध्यक्ष प्रवीण सोनार, अहिर समाजाचे सचिव भगवान वानखेडे, सहसचिव पूजा बागूल, उपाध्यक्ष किरण सोनार, ऋषिकेश देवरे, खजिनदार माधव दाभाडे, सह खजिनदार शिवाजी सोनार, दीपक सोनार, योगेश बाविस्कर, विनोद दुसाने वर्षा सोनार, स्मिता सोनार, शोभा अहीरराव यांनी परिश्रम घेतले.