पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अकॅडमीच्या पॅव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मे. शशांक फडके यांची वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे.
त्यांना निविदापूर्वक कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या 1.25 टक्के आणि निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या 0.75 अशाप्रकारे एकूण 2 टक्के तसेच अंतर्गत सजावटीच्या कामासाठी निविदापुर्व कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या 0.75 टक्के व निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या 0.50 टक्के अशाप्रकार 1.25 तसेच निविदा पश्चात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून 1.75 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समोर मंजुरीसाठी ठेवला आहे.