वेगवान धावपटू बोल्टचे निवृत्तीचे संकेत

0

जमैका । जगातील वेगवान धावपटू उसैन बोल्ट पुढील महिन्यात होणारी स्पर्धा उसैन बोल्टची शेवटची असणार आहे. या स्पर्धेतील 100 मीटर आणि 4 बाय 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी होणार असल्याचे बोल्टने प्रसिद्धीमाध्यमांशी सवांद साधताना सांगितले. लघु पल्ल्याच्या अनेक शर्यतीत विश्‍वविक्रम बोल्टच्या नावावर जमा आहेत. त्यात 100 मीटर आणि 200 मीटर धावण्याच्या शर्यतींचा समावेश आहे. बोल्टने 2009 मध्ये 100 मीटरचे अंतर 9.58 सेकंदात पूर्ण करत नवा विश्‍वविक्रम रचला होता.

निवृत्तीची हीच वेळ
मोनाका डायमंड लीग स्पर्धेच्या आधी माध्यमांशी संवाद साधताना बोल्ट म्हणाला की, जे काही मिळवायचे होते ते मिळवले आहे. सध्या लंडनमध्ये पदक जिंकण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. एका मित्राचे या वर्षाच्या सुरुवातीला निधन झाले त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला कमागिरी खराब झाली. लंडनमध्ये पदक जिंकून मी निवृत्त होणार आहे.