वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

0

जळगाव – तालुक्यातील वावडदा गावाच्या चौफुलीजवळ खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवर जाणार्‍या अभियंता राजेश पाटील स्कुलवर बसवर धडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. तर दुसर्‍या घटनेत सोयगावकडून जळगावकडे दुचाकीने येत असतांना नेरीरोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या संजय बारी यांचा गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत शहर पोलीसात शुन्य क्रमांकाने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभियंताच्या मृत्यूनंतर मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. यावेळी नातेवाईकांसह नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती.