पिंपरी-चिंचवड : भोसरी येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी स्वारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिली घटना शनिवारी (दि. 16) भोसरी येथील लांडगे नाट्यगृहासमोर घडली. यामध्ये प्रमिला शामराव टिपरे (वय 70, रा. नेहरू चौक, राजगुरुनगर) या पायी जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने टिपरे यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाला.
दुसर्या घटना बोपखेलमध्ये
तर दुसर्या घटनेत रविवारी (दि. 17) परशुराम भिकू घुले (वय 71) हे दुचाकीवरून रामनगर, बोपखेल येथून जात होते. यावेळी दुसर्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. यामध्ये ते खाली पडून त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणात अज्ञात दुचाकीस्वारांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.