वेगवेगळ्या अपघातात पाच जण जखमी

0
जिल्हापेठ, एमआयडीसी व शहर पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव – शहरात तीन वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत जखमींच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ, एमआयडीसी व शहर पोलिसात अपघातास कारणीभुत ठरलेल्या हनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावरील इच्छादेवी चौक ते आकाशवाणी चौकादरम्यान असलेल्या क्रेझी होम मंगल कार्यालयासमोर भरधाव कारने मोटारसायकलस्वारास जोरदार धडक दिल्याची रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलस्वार वृध्द गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे
महामार्गावर कारची दुचाकीला धडक
गोपीचंद शिवराम ठाकुर (वय-55) रा. गणपती नगर, जळगाव हे गणपती नगरकडूनत्यांच्या मुलगा विश्‍वास यांच्यासोबत घराकडून क्रेझी होम मंगल कार्यालयाच्या शेजारील रस्त्याने महामार्गावर जात असतांना त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणा-या कार क्रमांक पुर्ण (7027) नाही. ने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार यांच्या डोक्यास दुखापत झाली असून शहरातील अपेक्स हॉस्पिटलमध्‍ये दाखल करण्यात आले आहे. गोपीचंद ठाकूर यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शिवाजी पवार करीत आहे.
दोन मोटारसायकलींच्या धडकेत दोघे गंभीर
जळगाव-औरंगाबाद रोडवरील हॉटेल त्रिमुर्तीजवळ मोपेड मोटारसायकलीने समोरून येणार्‍या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. ही घटना रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात मोटारसायकलस्वार दोघे जण जखमी झाले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पातोंडा येथील रामकृष्ण बाळकृष्ण पाटील (वय-४०) हे त्यांच्या मोटारसायकलीने काका ब्रिजलाल बळीराम पाटील (वय-६६) रा. आदर्श नगर यांच्याकडे आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजेच्या सुमारास रामकृष्ण पाटील व त्यांचे काका ब्रिजलाल पाटील हे मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ एएच ३५१६) ने जळगाव-औरंगाबाद रस्त्याने जात असतांना हॉटेल त्रिमुर्तीजवळ समोरुन येणार्‍या मोपेड मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ सीडी ६४७९)ने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात रामकृष्ण पाटील व ब्रिजलाल पाटील हे दोघे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला जबर दुखापत झाली. नागररिकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून मोपेड दुचाकी विरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
कारची मोटारसायाकलला धडक 
शहरातील विद्यानगरातील रहिवाशी असलेले दिलीप शर्मा  हे त्यांच्या पत्नी पत्नी भावना शर्मा यांना रेल्वे स्टेशन येथे सोडण्यासाठी २४ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ बीडी ५३३३)ने जात होते. शाहुनगर कॉम्पलेक्स जवळील रोडवर समोरून वेगात येणार्‍या एमएच १९ बीयु २३३५ या कारवरील चालक संदिप चौधरी रा. शिवकॉलनी याने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. अपघातात शर्मा दाम्प्त्यांना जबर दुखापत झाली. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून शर्मा दाम्प्त्यांवर उपचार सुरु होते. आज भावना दिलीप शर्मा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात (एमएच १९ बीयु २३३५) वरील कारचालक संदिप चौधरी रा.शिवकॉलनी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.