वेगवेगळ्या घटनांमध्ये चार जण गंभीर जखमी

0

जळगाव । जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील दोघांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेत लचके तोडल्याची घटना सोमवारी घडली आहे. तर एरंडोल तालुक्यातील भोदकलना येथील तरुणाला शेतात फवारणीच्या वेळी विषबाधा झाली आहे. तसेच मुक्ताईनगर येथे एका तरुणाचा अपघात असून या चौघी जखमींवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. पाचोरा तालुक्यातील सातखेडा येथील जागृती राजधर पवार, सारोळा येथील लक्ष्मीबाई सुर्यभान पाटील या दोघांना आज पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडून गंभीर जखमी केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भोदकलना येथील शेतमजुर सुनिल अशोक भिल हा तरुण शेतात पीकाला फवारणी करीत असतान आज दुपारी त्याच्या तोंडात अनावधनाने फवारणीचे औषध उडाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तर मुक्ताईनगर येथील राकेश हरसिंग याचा दारुच्या नशेत अपघात झाल्याने त्याच्यावरही सामान्य रुगणालयात उपचार सुरू आहेत.