जळगाव । धरणगाव येथील एका 63 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात कोणतेतरी विषारी औषध घेवून आत्महत्याचा प्रयत्न केला तर दुसर्या घटने बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळकुठा येथील रहिवासी हे मुक्ताईनगर येथील मुक्ताईमंदीराच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोघांना नातेवाईक व मित्र मंडळींनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन रूपचंद चौधरी (वय-63) रा. धरणगाव यांनी राहत्या घरात विष घेतल्याने त्यांना अत्यवस्थ अवस्थेत नातेवाईकांनी उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तर बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळकुठा येथील रहिवासी आपल्या परीवारासह मुक्ताईनगर येथील मुक्ताई मंदीराचे दर्शन घेतले. मात्र मंदीराच्या आवारात विष घेतले. त्यांनी विष घेतल्याचे लक्षात येताचा नातेवाईकांनी तातडीने जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारानंतर दोघांची प्रकृती स्थिर आहे.