वेगवेगळ्या घटनेत दोघांनी केली आत्महत्या

0

एकाची गळफास तर दुस-याने घेतले विष
जळगाव – शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील साहेबराव रतन शिंदे वय-५२ यांनी गळफास घेवून तर जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील शिवाजी देवराम नाईक वय- ५० यांनी विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील डोमगाव येथील रहिवासी शिवाजी देवराम नाईक वय- ५० या इसमाने शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास विष प्राशन केले. यावेळी कुटूंबिंयाना माहित पडताच कुटूंबियांनी शिवाजी नाईक यांना तात्काळ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज सकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास शिवाजी नाईक यांचा मृत्यू झाला. अद्याप त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल भरत लिंगायत करीत आहेत.

पिंप्रळा हुडकोमध्ये इसमाची गळफस घेवून आत्महत्या
शहरातील पिंप्राळा हुडकोमधील रहिवासी साहेबराव सतन शिंदे वय-५२ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. कुटूंबियांनी साहेबराव यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता. त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. नातेवाईकांनी मृतदेह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी न दाखल करता. परस्पर त्यांनी साहेबराव यांचा मृतदेह त्यांच्या धानवड येथे त्यांच्या मुळगावी नेण्यात आला. दरम्यान ही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धानवड येथे जावून सुरु असलेली अंत्यसंस्कार रोखून मृतदेह जिल्हा वैद्यकीय रुग्णालयाल दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन साहेबराव यांचा मृतदेह धानवड येथे नेवून त्यांच्यावर सायंकाळच्या सुमरास अंत्यसंस्कसार करण्यात आले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.