जळगाव – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी गळफास घेतल्याची घटना आज घडल्या असून दोघांची तालुकापोलीसात आकस्मात
मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कल्पना नथूलाल चव्हाण (वय-45) रा.अंजनविहीरे ह.मु. विश्राम नगर, खोटेनगर जळगाव आणि
दुसऱ्या घटनेतील ज्ञानेश्वर आत्माराम कोळी (वय-35) रा. आसोदा ता.जि.जळगाव असे गळफास घेतलेले दोघांची नावे आहे. याबाबत
माहिती अशी की, कल्पना चव्हाण यांना गेल्या काही महिन्यांपासून दमाचा आजार असल्याने त्या सतत आजारी राहत होत्या. बुधवारी 10
ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरात कोणी नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. पती नथूलाल डोंगर
चव्हाण हे एलआयसी एजंट असून मुलगा अविनाश चव्हाण हा कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापिठात एमएस्सीचे शिक्षण घेत आहे तर
मुलीचे मागच्याच वर्षी लग्न झाले होते. मुलगा कॉलेजमधून आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरवून
तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. सुपे यांनी मृत घोषीत केले. डॉ. सुपे यांच्या खबरीवरून तालुका
पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत ज्ञानेश्वर आत्माराम कोळी (वय-35) रा. आसोदा यांनी
देखील राहत्या घरात कोणीही नसतांना दुपारी 15.40 वाजेच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. वैदयकिय अधिकारी डॉ. सुपे
यांच्या खबरीवरून तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Next Post