जळगाव । जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी चौघांना सापाचा चावा घेतला आहे. कंडारी, सोनोदी, ममुराबाद आणि शहरातील सुप्रिम कॉलनीतील पाच जणांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रूग्णालयातून मिळालेली माहिती अशी की, सोनी राजू जाधव (वय-26) रा. कंडारी ता. यावल यांना शेतात काम करत असतांना शेताच्या बंधार्यावर सापाने चावा घेतला. त्यांचे पती राजू जाधव यांनी तात्काळ त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. आनिल लक्ष्मण पाटील (वय-35) रा. सोनोदा ता.रावेर, आश्विनाबी मुस्ताकळ पटेल (वय-35) रा. ममुराबाद ता.जळगाव आणि पंचकुला शिलवंत पाटील (वय-24) रा. सुप्रिम कॉलनी, अजय सुरेश चौधरी (वय-18) रा. लोहारा ता.पाचोरा यांना देखील वेगवेगळ्या वेळी सापाने चावा घेतला. संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांनी उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून चौघांची प्रकृती स्थिर आहे.