लंडन । जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत ग्रेट ब्रिटनच्या संघाने सुवर्ण कामगिरी केली. उसैन बोल्ट असलेला जमैकाचा संघ पराभूत झाला. जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील 4 बाय 400 मीटरच्या शर्यतीत ब्रिटन संघातील उजाह, जेमिली, टेल्बॉट आणि मिशेल-ब्लेक यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. तर, गॅटलीनच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने रौप्यपदक आणि जपानच्या संघाने कांस्यपदक पटकावले.
बोल्टला आपल्या जमैका संघाला यश मिळवून देता आले नाही. शर्यतीत धावताना त्याच्या पायाला दुखापत झाली. बोल्टने विश्व अॅथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी करत निवृत्त होण्याचा निर्धार केला होता. मात्र त्यात तो अपयशी ठरला. गेल्या आठवड्यामध्ये पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये बोल्टला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. यावेळी अमेरिकेच्या जस्टीन गॅटलीन याने सुवर्ण पदाकावर कब्जा केला. हे बोल्टच्या कारकिर्दीतील पहिले आणि शेवटचे कांस्यपदक ठरले.