तळेगाव दाभाडे : रोटी देण्याच्या कारणावरून वेटरने आचार्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. ही प्रकार तळेगाव-दाभाडे येथील ठंडा मामला हॉटेलात घडला. याप्रकरणी सुधीर कमलाकर चोरडेकर आणि मनिष रविंद्र घात (रा.वडगाव मावळ) या दोन वेटरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टकेश्वर हैसराज जांगडे (वय 20, रा. सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी तळेगाव-दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि फिर्यादी हे तळेगाव-दाभाडे येथील ठंडा हॉटेलात कामाला आहेत. 19 नोव्हेंबर रोजी रोटी देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी सुधीर आणि मनिष यांनी टकेश्वर यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तळेगाव-दाभाडे पोलीस तपास करत आहेत.