वेटलिफ्टिंग स्पर्धेत भोलानाथ चौधरीला कांस्य पदक

0

रावेर । चंदिगढ येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेर येथील भोलानाथ मधुकर चौधरी यांनी 62 किलो वजनी गटात 230 किला वजन उचलून कांस्य पदक पटकावले. अतिशय चुरशीच्या लढतीत या खेळाडून जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. त्याची त्यांची प्रकृती अस्वस्थ असून सुध्दा त्यांने दमदार कामगिरी करुन प्रतिस्पर्धी खेळाडूंची चांगलीच दमछाक केली व स्पर्धेच्या शेवटच्या क्षणी अतिशय थोडक्यात त्याचे स्वर्णपदक हुकले. सदर खेळाडू हा जळगाव येथील सद्गुरु बी.पी.एड्. कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याने उमविच्या संघाकडून सदर कामगिरी केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणे एकमेव ध्येय

भोलानाथ चौधरी हा रावेर येथील व्ही.एस. नाईक महाविद्यालयातील जिमखान्यात प्रशिक्षक अजय महाजन व नितीन महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. 2018 मध्ये होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणे हे एकमेव ध्येय असल्याने त्यांनी सांगितले.

सदर खेळाडू याने यापुर्वी सुध्दा जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेकडून अनेक राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत जिल्हाकरीता पदके जिंकलेली आहे. त्याच्या या यशाबद्दल व्ही.एस. नाईक महाविद्यालय संस्थेचे चेअरमन हेमंतशेठ नाईक, प्राचार्य डॉ. आर.टी. चौधरी, क्रीडाशिक्षक उमेश पाटील, गरुड महाविद्यालय शेंदुर्णीचे प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील, जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रदिप मिसर, सचिव संजय मिसर, सदस्य राजेश शिंदे, प्रकाश बेलस्कर, अमोद महाजन, यशवंत महाजन, सरदार जी.जी. हायस्कुलचे क्रीडाशिक्षक ई.जे. महाजन, टी.बी. महाजन, जे.के. पाटील, युवराज माळी व रावेर शहरातील हनुमान व्यायाम शाळा, अंबिका व्यायाम शाळा, छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा व गावातील क्रीडा रसिकांनी सदर खेळाडूचे कौतुक केले.