वेटेलने जिंकली ब्राझीलीयन ग्रापी

0

साओ पावलो । फेरारीचा चालक सॅबेस्टीयन वेटेलने ब्राझीलीयन ग्रापीच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. फॉर्म्युला वन शर्यतींच्या यंदाच्या मोसमातील वेटेलचा हा पाचवा विजय आहे. या विजयासह वेटेलने ड्रायव्हर चॅम्पियनशिपमध्ये दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. मर्सिडीजच्या वॉल्टेरी बोटासने दुसरे स्थान संपादन केले. रविवारी उशीरा झालेल्या या शर्यतीत फेरारीचा किमी राइकॉनेन तिसर्‍या स्थानावर राहीला. मागील महिन्यात चौथ्यांदा विश्‍वविजेतेपद मिळवणारा लुइस हॅमिल्टनला यावेळी चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

विजयानंतर वेटेल म्हणाला की, सुरवात चांगली झाली होती. पण नंतर चाकात काहीतरी बिघाड झाल्याने त्रास झाली. त्यावेळी ही संधी मी गमावली असे वाटले. पण त्याचवेळी वाल्टेरीला काहीतरी अडचण निर्माण झाल्यामुळे मला विजयाची संधी मिळाली. बहुतेक मी त्यांना खूपच सतावले. हॅमिल्टन पहिला ड्रयव्हर चॅम्पियनशिपमध्ये 345 गुणांसह हॅमिल्टन पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ वेटेल 302 गुणांनी दुसर्‍या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 280 गुण मिळवणारा बोटास तिसर्‍या स्थानावर आहे.