रावेर : आसाम गुवाहाटी येथे सुरू असलेल्या 63 व्या राष्ट्रीय शालेय वेट लिफ्टिंग स्पधत सरदार जी.जी.हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच जळगाव जिल्हा वेट लिफ्टिंग संघटनेचा खेळाडू अभिषेक गणेश महाजन याने 50 किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकाविले. हा खेळाडू शहरातील व्ही.एस.नाईक महाविद्यालय जिमखान्यावर वेट लिफ्टिंग प्रशिक्षक अजय महाजन व लखन महाजन यांच्या मार्गदर्शना खाली सराव करतो.