वेडापावला येथे गटार कामाचे भूमिपूजन

0

नंदुरबार । तालुक्यातील वेडापावला येथे ग्रा.प. कार्यालय जवळ बंदीस्त गटाराचे भूमिपूजन माजी सभापती अर्चनाताई गावित यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच ज्योतिपाल वळवी, उपसरपंच भाऊ वळवी, ग्रामसेविका गावित व ग्रा. प. सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

या बंदिस्त गटारीमुळे स्वच्छता राखण्यास मदत होणार असून आरोग्याचा प्रश्न देखील सुटणार आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.