वेडा : बी.एफ.चे शनिवार वाड्यावर संगीत प्रकाशन सोहळा

0

पुणे । मराठी सिनेमात अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकून राहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नंदेश्‍वरसारख्या छोट्या गावातील अल्ताफ दादासाहेब शेख यांनी वेडा-बी.एफ. नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. नुकताच या सिनेमाचे संगीत प्रकाशन सोहळा शनिवार वाड्यावर मोठ्या जल्लोषात पार पडला. टायगर जिंदा है सिनेमातील खलनायक गेवी चहल यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा पार पडला.

याच सिनेमात पहिल्यांदा प्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांनी मराठीतून कव्वाली गायली आहे, ते देखील यावेळी उपस्थित होते. मुंबई क्रिएशन इंटरटेनमेंट आणि मुस्तफा मलिक यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची कथा, पटकथा, सवांद, गीते आणि दिग्दर्शन अल्ताफ शेख यांनी केले आहे. वेडा-बी.एफ.सिनेमाबद्दल अल्ताफ शेख सांगतात कि, यात हिंदू-मुस्लीम यांच्यातील ऐक्य कसे टिकून राहील हे दाखवण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचा असीम भक्त बाबूलाल पठाणच्या कुटुंबाची ही गोष्ट आहे. ज्याचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. त्याचेही शिवाजी महाराजांवर तेवढेच प्रेम आहे. पुढे त्याची मुलगी आणि बहीण हिंदू मुलांच्या प्रेमात पडतात, अशी ही कथा आहे. 19 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.