भुसावळ। खळवाडी परिसरातील वेडीमाता मंदिराजवळ श्रीमद् तुलसी रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरुवात झाली. यामध्ये कथाप्रवक्ते हभप दगडू महाराज बामणोदकर असून दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे 5 ते 6 काकडा आरती, सकाळी 8 ते 11 कथा, 2 ते 5 कथावाचन, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8 तेे 10 कीर्तन आदी कार्यक्रम होत आहे. यामध्ये हभप वाल्मिक महाराज, हभप वास्कर महाराज, हभप निवृत्ती महाराज, हभप दिपक महाराज, हभप दिपक महाराज शेळगाव, हभप सुकदेव महाराज यांचे कीर्तन झाले.
रविवार 9 रोजी हभप चंद्रकांंत महाराज यांचे तर सोमवार 10 रोजी हभप दगडू महाराज बामणोदकर यांचे दिंडी सोहळा व काल्याचे कीर्तन होईल. यात मृदुंग मणी हभप प्रभाकर महाराज, गायनाचार्य देवराम इंगळे, युवराज सरोदे, विष्णू पाटील, पंडीत चौधरी, माधव नेेहेते, अशोक पाटील, संंजय महाराज, प्रल्हाद ढाके हे आहे. यात श्रीराम मंदिर भजनी मंडळ, विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, वेडीमाता भजनी मंडळ, आराधना कॉलनी भजनी मंडळ, अवधूत भजनी मंडळ, सद्गुरु भजनी मंडळ, विद्यानगर भजनी मंडळ यांचा सहभाग आहे. यशस्वीतेसाठी वेेडीमाता मित्र मंडळ, सुदर्शन मंडळ, विद्यानगर मित्र मंडळ, आराधना मंडळ, बजरंग मित्र मंडळ, विशाल मित्र मंडळ, शिवकॉलनी मित्र मंडळ व दत्त मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे.