वेतन आयोगाच्या त्रुटीविरोधात रेल्वे कर्मचार्‍यांचे आंदोलन

0

मुंबई । सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात आली तरी 1 जानेवारी 2016 पासूनची तफावत न देताच हा आयोग लागू करण्यात आला आहे. त्या विरोधात केंद्र सरकारचा तीव्र निषेध करीत हजारो रेल्वे कर्मचारी, कामगार यांनी जोरदार आंदोलन केले. सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रेल्वे कर्मचार्‍यांना 1 जुलैपासून सातवा वेतन आयोग लागू केला. प्रत्यक्ष आयोगाची घोषणा 1 जानेवारी 2016 पासून झाली. मात्र, काही मागण्यांसाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर 1 जुलैपासून आयोगाची अंमलबजावणी रुजू झाली. मात्र, यामध्ये दरम्यानच्या दीड वर्षाची तफावत प्रत्येकी सुुमारे 1 लाख रुपये देण्यात आलेली नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये नाराजी आहे.

पंचवीस वर्षे सेंट्रल रेल्वे मजदूर संघात काम करणारे व गेली दीड वर्षे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनमध्ये सामील झालेले अरविंद कासकर यांची पुन्हा घरवापसी झाल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.