चाळीसगाव बाजार समितीतील प्रकार
सचिव जगदीश लोधे चा कारभार काढला, अशोक पाटील प्रभारी सचिव
चाळीसगाव :- येथील बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी आपल्या वेतन निश्चितिनंतर चा एक लाख सहा हजार सहाशे पासष्ट रुपयांचा फरक संचालक मंडळाला विश्वासात न घेता परस्पर काढून घेतला या मुळे संचालक मंडळाने सचिव जगदीश लोधे यांचा तडफतडफी सचिव पदाचा कारभार काढून घेतल्याची कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे
याबाबतची सविस्तर माहिती अशी की पाच जानेवारी दोन हजार सोळा पासून चाळीसगाव बाजार समितीच्या सचिवपदी जगदीश लोधे हे काम पाहत आहे नोकरीतिल नवीन वेतन निश्चितचा फरक सुमारे एक लाख पेक्षा अधिक रक्कमेच्या जवळपास निघत असल्याने तो मी काढून घेतला हे प्रसाशकीय कामकाज असल्याने मी काही चूक नसल्याचे सचिव जगदीश लोधे यांचे म्हणणे आह मात्र या बाबत बाजार समितीचे सभापती रवींद्र पाटील यांनी जनशक्ती शी बोलतांना सांगितले की गेल्या अनेक दिवसांपासून सचिव यांच्या कामकाजात अनियमितता होत असल्याचा विषय संचालक मंडळात चर्चेला गेला त्यातच सचिवानी हा चेक काढून घेण्याची घाई करून चूक केली आहे अशी खात्री झाल्याने त्यांच्या कडील सचिव पदाचा कारभार तडफतडफी काढून घेण्यात आला आहे या घटनेबाबत चौकशी समिती नेमून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे बाजार समितीने सचिव पदाचा कारभार सहाय्यक सचिव अशोक पाटील यांचेकडे सॊपविण्यात आला आहे या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.