शहादा । आमचे साहित्य अलंकारीक नाही आम्ही खस्त्ता खाल्या आहेत. मातीत फिरणारे, पोटासाठी झगडणार्यांसाठीच आमचं साहित्य होय. कथा कवितात माझे मन कधीच रमले नाही. म्हणून कादंबर्यात माझा व्यथा मांडल्या आहेत. आपले दुः ख आपल्या वेदना ह्या साहित्याचा माध्यमातून मांडा, हे आपले हक्काचे व्यासपीठ आहे. असे प्रतिपादन कॉ. नबुबाई गावित यांनी केले. शहादा येथे आयोजित तेराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. अंबरसिंग महाराज साहित्य नगरी व लोकशाहीरअण्णाभाउ साठे विचार मंच यांच्या सयुक्त विद्यमाने शहादा येथील मीरा प्रताप लॉन येथे दोन दिवसीय तेरावे विद्रोही साहित्य आणि सांस्कृतिक संमेलन आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मिरवणूक व ग्रंथ दिंडीने झाली. दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मिरवणुकीत विविध पथक!
तोरणमाळ साक्री येथील कला पथकांनी सहभाग नोंदविला मीरा प्रताप लॉन येथे मिरवणुकीची सांगता झाली. नंतर कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पुरोगामी साहित्यीक कॉ. नजूबाई गावीत तर स्वागत अध्यक्ष कवी वहारु सोनवणे होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ नाटककार आतमजितसिंग पंजाब, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आयु. अरविंद कुवर तर प्रमुख अतिथी म्हणून मुडनाकुडु चिन्नास्वामी, डॉ. गणेश देवी, डॉ. छाया दातार, डॉ भारत पाटणकर, कॉ. डोंगर बागुल, डॉ. भालचंद्र कांगो, साथी काळुराम धोधडे, डॉ बाबुराव गुरव, राजा शिरगुप्पे, दिनानाथ मनोहर, राजकुमार तांगडे, डॉ सुरेखा देवी , प्रा रणजीत परदेशी , कॉ सुहास परांजपे, कॉ. कुमार शिराळकर, संजय आवटे, राजकुमार बांगडे, सुभाष पाटील, विजय मांडके, विकास कदम, प्रा विश्वास सायनाकर, के. डी. शिंदे अविनाश कदम, प्राचार्य विनोदकुमार ओखे, गौतम कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
विचाराने आजही तरूण!
अध्यक्ष कॉ. नबुबाई गावित म्हणाल्या की, कार्यक्रमाचा निमित्ताने साहित्याची निर्मिती मी स्वतः केली. सुरुवातीला मी 4 थी शिकलेली त्यामुळे बर्याच विरोधाना सामोरे जावे लागले. अक्षर समजत नाही, भाषा समजत नाही या व अशा कारणानी साहित्य जन सामान्यात आणण्यास अडथळा आणण्यात आला. कॉ. शरद पाटील यानी मला प्रोत्साहीत केले. मावळाळ प्रकाशन माझ आहे. चौथी शिकलेली ही स्त्री काय लिहीन अशा टिका झाल्या माझा व माझा पुर्वजांचा इतिहास तरी यांना माहित आहे का? असा खोचक सवाल त्यांनी केला. वनाची राणी शबरी आहे, तिला देखील आदिवासी असल्याने राणी कशी होइल? असे प्रश्न विचारले जातात. आपकी जय हो हा पंथ आपला आहे. जो रामदास महाराज, गुल्या महाराज यानी मानला. तरुणांनी मागे रहाता कामा नये. त्यांनी लिहण्यासाठी व चळवळीसाठी पुढे यावे आम्ही चळवळी करुन थकलो पण विचाराने आज तरुण आहोत.
अनेक गोष्टींपासून आजही वंचित !
शिवाजी महाराजाना जनमाणसात पोहचविण्यासाठी जसा नाटकांचा ग्रंथाचा सहारा घेतला जातो तसा शबरी, बाबुजी नाइक यांना ही या माध्यमातून पोहचवल जाव असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. आजही आपले जिवन सुधारले नाही देशाचे परके म्हणूनच उभे आहोत. हिंदु कोड बिलावर देखील त्यांनी आपले मत मांडले जमीन, पाणी, वीजेपासुन आजही आपण वंचित आहोत. अगोदरचा धुळे येथील विद्रोही साहित्य सम्मेलनात मला बोलावले नाही त्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
आजचे कार्यक्रम असे
24 डिसेंबरला सकाळी 09.00 ते 11.00 दरम्यान गटचर्चा आयोजित करण्यात आली आहे.यात एकूण 6 गट करण्यात आले आहेत. या सत्राचे अध्यक्ष डॉ.भालचंद्र कांगो असतील. 11:00 ते 12:30 दरम्यान सम्मेलनातील तीसरा परिसंवाद होईल. या परिसंवादाचा विषय परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.छाया दातार व तर वक्ते म्हणून प्रा.सचिन गरुड,कॉ.ठगीबाई वसावे, रंजना पावरा, श्रुती आवटे,आदी असतील. 12.30 ते 2.00 दरम्यान पद्मश्री डॉ गणेश देवी व डॉ सुरेखा देवी यांची जाहीर मुलाखत घेण्यात येणार आहे. 02:30 ते 04:00 दरम्यान चौथा परिसंवाद होईल. या परिसंवादाचा विषय जात वर्ग स्त्री दास्य अंता शिवाय लोकशाही मूल्य व्यवस्था बळकट होणार नाही, हा आहे. या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर असतील, तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.रणजीत परदेशी, प्रा.डॉ. नारायण भोसले. प्रा.डॉ.देवेंद्र इंगळे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी चार वाजत समारोप होईल.
परिसंवादाचे आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण मोहिते यांनी तर आभार कॉ. सुनिल गायकवाड यांनी मानले. नंतर दुपारुन शहादा तापी सातपुडा परिसरातील चळवळीचा इतिहासावरील ठसा व आदिवासी संस्कृतीतील लोकशाही मुल्य व्यवस्था आणि फॅझमविरोधी लढा यावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर सायंकाळी कवी सम्मेलन व कला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजंन करण्यात आलेले होते.
कालबाह्य विचारांना घरातून काढा!
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वहारु सोनवणे यांनी आपले मनोगत मांडले व ते म्हणाले की माणसात माणुसकीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. विद्रोही म्हणजे काय? त्याची व्याख्या करताना म्हणाले की समता, बंधुता माणुसकी साठी केलेला बंड म्हणजे विद्रोह होय. पुढे ते म्हणाले की शोषणाविरोधात महामानवानी लढा दिला. आपण धर्मांध शक्तीविरोधात लढले पाहिजे, ते कुठे आहे शोधले पाहिजे, माणुस म्हणून जगु देत नाही त्यांच्या विरोधात लढले पाहिजे. कालबाह्य विचाराला घरातून काढले पाहिजे तरच आपण माणुसकीची लढाई लढु.