मुंबई । वेदांत वैद्यने नाबाद 104 धावांची खेळीमुळे ( 10 चौकार) बालमोहन विद्यामंदिर इंग्लिश मिडियम संघाने गाईल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेतील 14 वर्षाखालील मुलांच्या गटात एसआयईएस स्कूल संघावर 186 धावांनी विजय नोंदवला.वेदांतला आर्य राऊतने 49 धावा करत चांगली साथ दिली. बालमोहन विद्यामंदिर इंग्लिश मिडियम संघाने 8 विकेट्सच्या मोबदल्यात 266 धावा केल्या.एसआयईएस स्कूल संघाला मात्र चांगली कामगिरी करता आली नाही. अन्वित भोबेने 9 षटकात 5 विकेट्स घेतल्या. वेदांत पेंढारकरने तीन विकेट्स मिळवल्या. यांच्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले.