गळा दाबुन खुन केल्याचा नातेवाईकांचा संशय
पाचोरा – तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील ३२ वर्ष वयाच्या विवाहीतेने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केली. मात्र तिच्या गळ्यावर, उजव्या हातावर, पायावर नखं ओरबाडल्याच्या जखमा असल्याने तिला गळा दाबुन मारण्यात आले. व नंतर बळजबरीने विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. मयत विवाहीतेची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा संशय माहेरच्या मंडळींस असल्याने शवविच्छेदनासाठी धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. धुळे महाविद्यालयाचा अहवाल आल्यानंतरच आत्महत्या की हत्या याविषयी उलगडा होईल. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील रविंद्र सुपडु पाटील याने ६ रोजी रात्री दारुच्या नशेत तर्रर्र होवुन त्याची पत्नी उमा रविंद्र पाटील हिस मारहाण केली. व बाहेर निघुन गेला. आर्धा तासाने परत आल्यानंतर उमा हि घरात असलेले मोनोसिल नावाचे विषारी औषध सेवन करुन आतुन कडी भरुन घेतली होती. रविंद्र याने तिला आवाज दिल्यावर कडी उघडल्यानंतर विषारी औषध सेवन केल्याचे निदर्शनास आल्याने गल्लीतील महिलांनी विषारी औषध पोटातुन निघण्यासाठी मिठाचे पाणी पाजले. मात्र मयत उमा रविंद्र पाटील हिचा आठ वर्षांच्या राज नावाच्या मुलाने माझ्या मम्मीचा पप्पांनी गळा दाबल्याचे महिला समितीच्या सदस्या व पत्रकारांसमोर माहिती दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांची भेट घेऊन आरोपीस मोठ्यात मोठी शिक्षा होईल. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करावा. अशी विनंती केली. घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करित आहे.
Prev Post
Next Post