सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनीत असलेल्या जगप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रीजवर फटाक्यांची आतषबाजी करत नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. हा अद्भूत सोहळा पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक सिडनीत आले होते.
तसेच, सर्वात पहिल्यांदा नववर्षाचे स्वागत करण्यासाठी न्यूझीलंडमधील महत्त्वाचे शहर असलेल्या ऑकलंडमध्ये पर्यटकांची गर्दी झाली होती. स्काय टॉवरवर डोळ्याचे पारणे फेडणारी रोषणाई आणि आकर्षक आतषबाजी करून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.