वेल्हाळेतही मतदारांची भाजपालाच पसंती

0

लोकनियुक्त सरपंचपदी सीमा पाटील यांची निवड

भुसावळ: तालुक्यातील वेल्हाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही मतदारांनी भाजपाला कमळाला पसंती दिल्याने ही ग्रामपंचायतही भाजपाच्या ताब्यात आली आहे. नऊ पैकी सहा जागांवर भाजपाचे सदस्य तर अन्य तीन जागांवर राष्ट्रवादी व सेनेचे सदस्य विजयी झाले. लोकनियुक्त सरपंचपदी सीमा विजय पाटील विजयी झाल्या. आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वावर मतदारांनी येथेही विश्‍वास टाकत भाजपा उमेदवारांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून आणले.