वेल्हाळे तलावाच्या खोलीकरणाला अखेर सुरवात

0

संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला यश

भुसावळ- तालुक्यातील विल्हाळे तलाव गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांच्या गर्तेत असल्याने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रतीकात्मक आंदोलन छेडण्यात आले होते मात्र प्रशासनाने दखल घेवून तलावाातील गाळ व आजूबाजूचा मुरूम काढून प्रत्यक्षात कामाला प्रारंभ केल्याने समाधान व्यक्त होत आहे. हा तलाव मासेमारी व शेतकर्‍यांसाठी वरदान ठरला असून या तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते.

आंदोलनाच्या मात्रेनंतर नरमले प्रशासन
प्रतीकात्मक आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने तलावातील गाढ काढण्याच्या कामास मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने पुनश्‍च आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. विल्हाळे तलावात दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राची वाया जाणारी राख साचल्याने संपूर्ण तलाव राखेने भरला आहे तर तलावाचे खोलीकरण केले जात असल्याने पाण्याचा जलसाठा वाढून शेतकर्‍यांसह मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यांची होती उपस्थिती
तलाव खोलीकरण व रुंदीकरण करून येथील गाळ (माती) व तसेच मुरूम महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी वापरली जात आहे. प्रसंगी संभाजी बिग्रेडचे जिल्हा संघटक ज्ञानेश्वर आमले, तालुकाध्यक्ष आकाश कुरकुरे, विजय पाटील, राजु सुरवाडे, महेश पाटील, दिनेश पाटील, विलास सुरवाडे, महेश महाजन, योगेश पाटील, संजय बोदडे, नितीन सुरवाडे, विनायक पाटील, सुभाष ठोके, रामसिंग पाटील, अनिल महाजन, शब्बीर बागवान, सोपान बोंडे, रामा बोंडे आदी उपस्थित होते.