वेळप्रसंगी मंत्र्यांना शहरबंदी करु : विशाल वाकडकर

0

राष्ट्रवादी युवकतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपाच्या सत्ताधार्‍यां विरोधात विविध प्रश्‍नांवर जनजागृती सुरु केली आहे. त्याची धास्ती घेऊन मुख्यमंत्र्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम मिळकत धारकांकडून शास्तीकर वसुल करु नये असा आदेश काढू असे आश्‍वासन दिले. राष्ट्रवादीच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना शास्तीकराबाबत आश्‍वासन द्यावे लागले. या आश्‍वासनाची व निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता जोपर्यंत सत्ताधारी करत नाहीत. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल व वेळप्रसंगी त्यांच्या मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना शहरबंदी करु, असे पत्रक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

आंदोलनामुळे सत्ताधारी हादरले
या पत्रकात वाकडकर पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मंगळवारी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या भवनासमोर शास्तीकराच्या विरोधात तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद आणि शहरातील मिळकत धारकांच्या तीव्र प्रतिक्रियामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन हादरले. त्याचा परिणाम लगेचच दुसर्‍या दिवशी बुधवारी सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन दिले. या आश्‍वासनाची व निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनाची पुर्तता जोपर्यंत सत्ताधारी करत नाहीत. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल व वेळप्रसंगी त्यांच्या मंत्र्यांना व मुख्यमंत्र्यांना शहरबंदी करु.