पिंपरी : काचबिंदू आजारांमध्ये डोळ्यांचा दाब वाढतो. त्यामुळे डोळ्याच्या आतील असलेली नस (ऑप्टिक नर्व्ह) कमजोर होते. कमजोर नसेमुळे डोळ्याची कार्यक्षमता कायमस्वरूपी मंदावते. काचबिंदू आजारांमध्ये कायमस्वरूपी अंधत्व येते. यामुळे काचबिंदू तपासणी वेळीच करणे गरजेचे आहे. मधुमेह रुग्ण, चष्म्याचा मोठा नंबर असणे, 50 वयाच्या नंतर रुग्णांना काचबिंदू होण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती इन्साईट इन्स्टिट्यूट ऑफ़ ऑप्थल्मॉलॉजीचे अध्यक्ष नेत्रतज्ज्ञ डॉ. अभिजीत आग्रे यांनी दिली. भोसरी- स्पाइन रोडवर असलेल्या इन्साईट इन्स्टिट्यूट ऑफ़ ऑप्थल्मॉलॉजीच्यावतीने काचबिंदू सप्ताहनिमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या मोफत काचबिंदू निदान व उपचार शिबिरात 60 जणांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात सुमारे एक हजार रुपये खर्च असलेली पेरिमेट्री तपासणी देखील मोफत केली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. वरपुडकर, डॉ. अंजली सपार यांनी विशेष परिश्रम घेतले.