शिंदखेडा। समाजामध्ये तरूणींनी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल वेळीच माहिती दिल्यास अत्याचारास प्रतिबंध घालून दोषींवर कारवाई करता येते. त्यासाठी तरूणींनी पुढे यावे व अतिशय सक्षमपणे अत्याचाराविरोधात उभे रहावे असे आवाहन अॅड. अमित दुसाने यांनी केले. ते स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पडोस युवा संसद आणि विकास कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष दिपक देसर्व होते. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व नेहरू युवा केंद्रातर्फे यासारखे विविध कार्यक्रम घेण्यात येतात. यामुळे विद्यार्थीनींनीमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्यांच्यात धाडस निर्माण होत असल्याचे मत अॅड. अमित दुसाने यांनी व्यक्त केले.
विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन नगरपंचयातीचे मुख्याधिकारी अनिल निकम यांनी स्वच्छ भारत अभियान व शौचालय याविषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारत सरकारने घर तेथे शौचालय या योजनेपासून स्वच्छ भारत- सुंदर भारत हे स्वप्न पूर्ण करण्याचे उद्दिष्टी ठेवले आहे. तरूणांनी या विषयी आपल्या गावांत जनजागृती करण्याचे आवाहन लिकत यांनी केले. दोंडाईचा येथील प्रा. अक्षय चौधरी यांच्या कॅशलेस बँकींग या विषयाबद्दल प्रोजेक्टरच्या सहाय्याने माहिती दिली. कॅशलेस व्यवहारात नेट बॅकींग करत असतांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले. प्रा. उमेश चौधरी यांनी प्रधानमंप्ी उज्वल योजना या विषयी माहिती दिली. देशात मुलींची संख्या वाढवी यासाठी समाजात या योजनेविषयी माहिती कुटुंबापर्यंत पोहचविण्याचे आवहन केले. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात येणार्या सामाजिक कार्याची दखल घेत नगरपंचायतीतर्फे संस्थेला सन्मानपद्ध देवून गौरविण्यात आले. प्रास्तविक संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद गुरव, सूत्रसंचालन चेतन गुरव यांनी तर आभार कुणाल गुरव यांनी मानले. यशस्वीतेसाठी वैभव चौधरी, नितीन गुरव, प्रमोद पाटील, हितेश चौधरी, दर्शन गुरव, दिनेश चौधरी, विनोद देसले, गौरव ठाकूर आदींनी कामकाज पाहिले.
कुटुंबात संवाद हवा
राजेंद्र राजपूत, अजित निकम, प्रा. अक्षय चौधरी, सुभाष माळी, विनायक पवार, परेश शाह, महेंद्र मराठे, अमोल मराठे, योंगेंद्र परदेशी, निलेश राजपूत आदी उपस्थित होते. अॅड. अमित दूसाने यांनी महिला सक्षमीकरण आणि महाविद्यालयीन तरूण-तरूणींसाठींचे कायदे या विषयांवर मार्गदर्शन केले. आज समाजामध्ये, कुटूंबांत देखील तरूणींवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. याविषयी तरूणींनी वेळीच योग्य ते पाऊज उचलून अत्याचार्याबद्दल कुटूंबीतील व्यक्तींचा संवाद नसल्यामुळेच घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.