कासोदा। चोपडा तालुक्यातील वेळोदा येथील ग्रामपंचायत सरपंचपदी सिमा सुभाष नेरपगारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नेरपगारे ह्या माजी सरपंच कै.उत्तमराव पाटील यांच्या सुन असून जिल्हा बँकेचे संचालक सुभाष नेरपगारे यांच्या पत्नी आहेत. एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील त्यांचे माहेर आहे. सरकार महर्षी कै.खंडेराव आबा यांची पुतणी व आडगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शालीग्राम पाटील यांच्या त्या कन्या आहेत. त्यांना राजकीय वारसा लाभल्याने ते गावाच्या विकासाकरीता प्रयत्न करणार आहे.
सरपंच पदाच्या निवडीकरीता घेण्यात आलेल्या बैठकीतच्या अध्यक्षस्थानी बाबुराव बोरसे होते. यावेळी ललित बागुल, रमांकात बोरसे, अनिल बोरसे, अरुण सोनवणे, रमेश नेरपगारे, जिजाबराव नेरपगारे, के.आर.सोनवणे, सुदाम सोनवणे, संजय सैदाणे, बापू बोरसे, आनंदराव बोरसे, व्ही.आर.चौधरी, नरेश जैस्वाल, निर्मला सुतार, भगतसिंग पाटील, विविध संस्थेचे पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी सरपंच संजय बोरसे यांनी केले तर आभार माजी सरपंच रमाकांत बोरसे यांनी मानले.