वेळ देऊन लेकरांना घडवा

0

उमरखेड यवतमाळ। मुलं हीच तुमची खणी संपत्ती असेल तर त्यांना घडविण्यासाठी पालकांनी वेळ द्यायलाच हवा.तरच भविष्यातला समाज खर्‍या अर्थाने घडेल.अन्यथा संस्कारहिनतेची बळी ठरली तर पुढची पिढी तुमच्या वृध्दापकाळात तुम्हाला वाळीत टाकणारी पाहायला मिळेल, असा सल्ला प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील यांनी येथील होप या सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘आई’ गौरव पुरस्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पालकांना दिला. या ‘आई’ गौरव पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीयमंत्री सूर्यकांता पाटील होत्या.आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,उत्तमराव इंगळे, विजय खडसे, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद , नगराध्यक्ष नामदेव ससाने, डॉ.विजय माने, जि.प. सदस्य राम देवसरकर, चितांगराव कदम, डॉ.इंदुमती खंदारे, सुषमा जाधव, विनोद जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मुक्ता ओझलवार, प्रा. जया खरडेकर, प्रा देवकांत वंजारे, अरविंद ओझलवार, डॉ. वसंतराव खंदारे, डॉ. विठ्ठलराव खंदारे, डॉ. ज्ञानेश्‍वर खंदारे,उषातेई खंदारे आदींनी परिश्रम घेतले.

राजकारण्यांनीच स्त्रीला जातीपातीत जखडून ठेवले ः यावेळी स्त्रीयांच्या प्रश्‍नांची मांडणी करताना अ‍ॅड. ललिता पाटील म्हणाल्या की, स्त्री ही दैवीशक्ती आहे.मात्र आजच्या समाजात राजकारण्यांनीच स्त्रीला जातीपातीत ज्खडून ठेवलेले आहे, हे दुर्दैवी वास्तव आहे. स्त्री अत्याचारांच्या घटनांना जातीयवादाचे रंग देण्याची मानसिकता बळावणे हे त्याचेच लक्षण आहे. राजकारण्यांनी महिलांना जातीपातीत जखडून न ठेवण्याचे व या अत्यंत लाजीरवाण्या वस्तुस्थितीतून समाजानेच मार्ग काढण्याचे आवाहनही अ‍ॅड. ललिता पाटील यांनी केले.या सोहळ्याचे प्रास्ताविक डॉ. अविनाश खंदारे यांनी केले.

कर्तृत्ववान मातांचा गौरव
या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते केवळाबाई देवसरकर, शोभाबाई देवसरकर, शकुंतलाबाई मैंद, प्रतिभा खडसे, अंबुबाई ससाने, पुष्पाबाई चव्हाण, कमलबाई गोरे, सिंधुबाई नरवाडे, प्रभादेवी अग्रवाल, इंदुमती माने, जिजाबाई धबडगे, जिजाबाई साकरकर, निर्मला इटकरे, सुशिला कोकडवार, विमलबाई तेला, वनिताबाई मामीडवार, संगीता राठोड, अलहाज बिस्मिल्लाबी शेख, ज्योती साबळे, द्रौपदाबाई भुते, शांताबाई धात्रक, सुमती डहाळे, कावेरी बिच्चेवार या मातांचा सत्कार करण्यात आला.