हे देखील वाचा
लव सोनिया करताना केलेल्या निरीक्षणाविषयी सई ताम्हणकर सांगते, “आपण कळत्या वयापासून या व्यवसायाविषयी कितीही ऐकलं असलं तरी, माझ्यासारखी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात लहानाची मोठी झालेली व्यक्ती जेव्हा वेश्यावस्तीत पहिल्यांदा पाऊल ठेवते. तेव्हा पहिल्याच दिवशी मनाला लागणारा चटका शब्दात न सांगण्याजोगा आहे. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत पाच-पाच माणसं कशी राहतात, कशा अवस्थेत आणि वातावरणात देहविक्रयाचा व्यापार होतो. हे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यातली दु:खच तुम्ही विसरून जाता. असे बोलताना म्हणाली .